‘मोदीजी, विकास पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:14 AM2019-10-17T00:14:16+5:302019-10-17T00:15:38+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही माझ्याविरूध्द प्रचार सभा घेण्यासाठी परळीत येत आहात. तुमचे परळीकरांच्या वतीने स्वागतच आहे. मात्र तुम्हाला तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास खरोखरच पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई-परळी रस्त्याने या असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

'Modiji, if you want to see development, come by Ambajogai road instead of helicopter' | ‘मोदीजी, विकास पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या’

‘मोदीजी, विकास पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या’

Next

परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही माझ्याविरूध्द प्रचार सभा घेण्यासाठी परळीत येत आहात. तुमचे परळीकरांच्या वतीने स्वागतच आहे. मात्र तुम्हाला तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास खरोखरच पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई-परळी रस्त्याने या असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे म्हणाले, विरोधक धास्तावले असून, आता प्रचारातले शेवटचे अस्त्र म्हणून भाजपाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट परळीला सभेसाठी पाचारण केले आहे.
गुरूवारी होणाऱ्या सभेच्या पाशर््वभूमीवर धनंजय मुंडे यांनी एक टिष्ट्वट करून मोदीजींचे स्वागत केले आहे. मात्र या टिष्ट्वटमध्येच त्यांनी एक इच्छा व्यक्त केली असून, मोदीजी परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास दिसेल, असा टोला लगावला आहे.
चंद्रयान २ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, चंद्रावरील प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर अंबाजोगाई-परळी प्रवासादरम्यान तुम्हाला मिळेल, एकच करा २० कि.मी. च्या रस्त्याला ४ तास लागतात. त्यामुळे १२ वाजता सभा आहे. त्यासाठी सकाळी ८ वाजताच निघा, तुम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा असेही मुंडे यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. परळी-अंबाजोगाई या परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वात महत्वाच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. ३ वर्षांपासून हा रस्ता उखडून ठेवण्यात आला असून, ३ वेळा भूमिपूजन करूनही काम पूर्ण न झाल्याने परळीकरांना प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले.
माझ्यासारख्या काम करणा-याला संधी द्या : धनंजय मुंडे
परळी : काही लोकांचे फक्त नाव मोठे असते काम मात्र शून्य असते. मी मात्र काम करणारा सामान्य कार्यकर्ता असून, नावापेक्षा काम करणा-या माणसाला संधी द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी टोकवाडी येथील जाहीर सभेत केले. यावेळी माधवराव मुंडे, दशरथ मुंडे, सूर्यभान मुंडे, बालाजी मुंडे, अमर गित्ते, कोकाटे महाराज, माऊली मुंडे, राजाभाऊ काळे, संदिपान काळे, तुकाराम काळे, वाल्मिक मुंडे, नाथराव मुंडे, भीमा रोडे, महादेव रोडे, महिपती मुंडे, सुरेश रोडे, पंडित पारधे, उत्तम हरेगावकर, गजेंद्र मुंडे, महादेव मुंडे, राजाभाऊ मुंडे, पप्पु मुंडे, अंगद मुंडे, बापूराव गित्ते, अशोक भांगे आदी उपस्थित होते.

Web Title: 'Modiji, if you want to see development, come by Ambajogai road instead of helicopter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.