फूस लावून मुलीला पळविणारा आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:59 AM2021-03-13T04:59:09+5:302021-03-13T04:59:09+5:30

आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला गावातीलच राहुल शितोळे या तरुणाने मंगळवारी फूस लावून चारचाकी वाहनात बसवून पळविले होते. ...

Mokat accused of kidnapping a girl by seduction | फूस लावून मुलीला पळविणारा आरोपी मोकाट

फूस लावून मुलीला पळविणारा आरोपी मोकाट

Next

आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला गावातीलच राहुल शितोळे या तरुणाने मंगळवारी फूस लावून चारचाकी वाहनात बसवून पळविले होते. मुलीचा शोध घेतला, ती मिळून न आल्याने चौकशी केली असता तिला शितोळे याने पळविल्याचे समजताच त्याने कडा धामणगावरोडवर मुलीला सोडून पळ काढला. आष्टी पोलीस ठाण्यात तसा गुन्हा त्याच दिवशी दाखल झाला. दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी आरोपी मोकाटच असल्याने व आष्टी पोलिस उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त करून या प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले. याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. त्याआनुषंगाने आष्टी पोलिसांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Mokat accused of kidnapping a girl by seduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.