मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:07+5:302021-04-09T04:35:07+5:30

लघुप्रकल्पांची दुरुस्ती रखडली अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघुप्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. ...

Mokat cattle sit on the road | मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या

मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या

Next

लघुप्रकल्पांची दुरुस्ती रखडली

अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघुप्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी व मोठी कामे या माध्यमातून व्हावीत. अनेक प्रकल्पांना गेट बसवणे, गेटची दुरुस्ती अशा कामांसाठी निधींची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत.

आठ दिवसांआड पाणी पुरवठा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करणा-या मांजरा धरणात शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. तरीही अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याने वेळी-अवेळी केव्हाही पाणी सोडले जाते. कोणत्याच प्रभागाचा पाणी सोडण्याचा दिवस ठरलेला नसल्याने मनमानीपणे पाणी सोडले जाते. मुबलक पाणी साठा असूनही आठ दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

महावितरण बिलाचा ग्राहकांना शॉक

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेतक-यांना महावितरणकडून दिली जाणारी बिले अव्वाच्या सव्वा प्रमाणात देण्यात आली आहेत. कोणत्याही विद्युत पंपाला मीटर नसल्याने देण्यात येणारी बिले अंदाजाने देण्यात येतात. मात्र, ज्या शेतक-यांकडे कमी व्हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटारी आहेत. अशा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वीज बिले आली आहेत. महावितरणच्या या वीज बिलाच्या शॉकने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.

नुकसानीचे पंचनामे नाहीत

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज व विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा व ज्वारी भिजल्याने ज्वारी काळी पडू लागली आहे. तर हरभरा डागील झाला आहे. गव्हाचे पीकही पांढरे पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या नुकसानीचे महसूल प्रशासनाच्या वतीने अद्यापही पंचनामे नाहीत. पंचनामे करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.

वाळूचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षात वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते १६ हजार रुपयांना मिळणाऱ्या वाळूच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुप्पटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.

Web Title: Mokat cattle sit on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.