न्यायप्रविष्ट जागेवरील बांधकाम पाडलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोकाट; कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:25+5:302021-08-19T04:36:25+5:30
- A - A आष्टी : न्यायप्रविष्ट जागेवरील बांधकाम पाडलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले, तर ...
- A - A
आष्टी : न्यायप्रविष्ट जागेवरील बांधकाम पाडलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले, तर मुख्य आरोपीवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्या आरोपीवर तातडीने कारवाई करून परिस्थिती पाहून योग्य ते कलम लागू करावे, अशी मागणी जागामालक मनोज चौधरी यांनी १३ ऑगस्टला आष्टी येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, गेल्या ८ ते ९ वर्षांपासून सक्रिय राजकारण करीत असून, स्थानिक विरोधक या गोष्टीचा मनात राग धरून सूडबुद्धीने राजकारण करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते व त्याचे होर्डिंग माझ्या खासगी जागेमध्ये लावले होते. त्या दिवशी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान भाजपचे स्थानिक आमदार सुरेश धस व त्यांच्या समर्थकांनी माझ्या सर्व २० गुंठ्यातील प्रॉपर्टीचे पोकलॅन व जेसीबी मशीनने नुकसान केले. विरोध करण्यासाठी तेथे गेलो असता माझ्यासह कुटुंबावर हल्ला केला. याबाबत आष्टी पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.