शासकीय गोदामातील हमालांचे मासिक बील थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:22+5:302021-05-07T04:35:22+5:30
धारूर येथील तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामावर हमालीचे दहा जण काम करतात. हातावर पोट असणारे हे हमाल ...
धारूर येथील तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामावर हमालीचे दहा जण काम करतात. हातावर पोट असणारे हे हमाल गेल्या चार महिन्यांपासून अडचणीत आहेत. जानेवारी पासून त्यांचे कामाचे हमाली बील न झाल्याने पैसे मिळण्यापासून वंचित आहेत. कोरोना संकट काळात कामाचे पैसे न मिळल्याने या हमालांच्या कुंटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या हमालांचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याचे हमाली बील थकित होते, यात आता एप्रिलची भर पडली आहे.तात्काळ हे हमाली बील देण्यात यावे आशी मागणी या हमालांनी केली आहे. तसेच हमालांना कोरोना काळात करत असलेल्या कामांमुळे विमा संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हमाली बील दाखल केले आहे
गोदाम मधील हमालांचे बील तहसील कार्यालयात दाखल करण्यात येते व हमालांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा होतात. जानेवारी महीन्यापर्यंतचे बील निघाल्याचे समजते. पुढील बीलही लवकरच निघेल.- कपिल गोडसे, गोदाम रक्षक, धारूर.
===Photopath===
060521\img_20210425_112703_14.jpg