जातीअंत संघर्ष समितीचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:12+5:302021-07-14T04:39:12+5:30

ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी अंबाजोगाई : ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपी डाॅक्टरास अटक करून संबंधित रुग्णालयाचे सीसीटिव्ही फुटेज जप्त ...

Morcha of Anti-Caste Struggle Committee at Deputy Collector's Office | जातीअंत संघर्ष समितीचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जातीअंत संघर्ष समितीचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next

ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी

अंबाजोगाई : ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपी डाॅक्टरास अटक करून संबंधित रुग्णालयाचे सीसीटिव्ही फुटेज जप्त करावे, या मागणीसाठी अंबाजोगाई येथील जातीअंत संघर्ष समितीच्यावतीने बाबूराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर १२ जुलै रोजी दुपारी मोर्चा काढण्यात आला.

अंबाजोगाई शहरातील सदर बाजारातून निघून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात बहुजन समाजातील आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई उपविभागात मागील वर्षभरात स्त्री अत्याचार व दलित अत्याचार वाढलेले असून धनदांडगे व लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे आरोपींना अटक होत नाही. पोलीस अधिकारी हे राजकीय दबावाखाली असल्यामुळे पीडितांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपले कायदेशीर कर्तव्य बजावत नाहीत. डॉ. सुहास यादव यास मदत करणारे त्याचे नातेवाईक यांनी वेगवेगळे राजकीय दबाव आणून त्यांची धरपकड थांबविली. त्या सर्व नातेवाईकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ॲट्रॉसिटी गुन्ह्यांबाबत गंभीर इशारे देऊनही गरिबांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पोलीस व महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने पीडितांवर दबाव येत असल्याचे मागील काही दिवसांतील घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे डॉ. सुहास यादवसह इतर ॲट्रॉसिटीज गुन्ह्यामधील सर्व फरार आरोपींना अटक करून त्यांचा तपास करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, ॲड. विलास लोखंडे, अस्मिता ओव्हाळ, आशालता पांडे, चित्रा पाटील, अक्षय भूंबे, विनोद शिंदे, अमोल हातागळे, गुड्डू जोगदंड आदींच्या सह्या आहेत.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा हे संविधानाने दिलेले कवचकुंडल-बाबूराव पोटभरे

अ‍ॅट्रॉसिटी कायदा हे संविधानाने संरक्षणासाठी दिलेले कवचकुंडल आहेत. ही कवचकुंडले जर कोणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर समाज शांत बसणार नाही. ज्या ज्यावेळी अन्याय अत्याचार होईल, तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी बाबूराव पोटभरे यांनी दिला.

120721\img-20210712-wa0044.jpg

अंबाजोगाईत जाती अंत संघर्ष समिती च्या वतीने मोर्चा काढण्यात आला

Web Title: Morcha of Anti-Caste Struggle Committee at Deputy Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.