पोलीस प्रशासनाकडून मोर्चा आंदोलनास सहकार्य मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:28+5:302021-05-28T04:25:28+5:30
बीड : ५ जून २०२१ रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजातील तरुणांना, ...
बीड : ५ जून २०२१ रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजातील तरुणांना, समाजात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासन त्रास देत आहेत. मराठा समाजाच्या मोर्चास सहकार्य करावे, याकरिता २७ मे २०२१ रोजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आ. विनायक मेटे व शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला न्याय कसा देणार, आरक्षण कसे मिळणार. मुला-मुलींचे शिक्षणात आणि नोकरीमध्ये काय करणार, त्यांच्या शिष्यवृती, फीसची प्रतिपूर्ती यासारख्या प्रश्नावर शासन कोणतीही भूमिका घेत नाही म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ जून २०२१ रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता पार पडेल. त्याचप्रमाणे कोरोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टन्सिंग पाळून हा मोर्चा निघेल. आजवर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा शांततेत निघण्याचा इतिहास लक्षात घेऊन हा नियोजित मोर्चा शांततेत काढण्यासाठी पोलीस प्रशासन व गृहमंत्र्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
===Photopath===
270521\27bed_19_27052021_14.jpg
===Caption===
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आ. विनायक मेटे व शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.