मोर्चा तर निघणारच ! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:55+5:302021-06-05T04:24:55+5:30

बीड : कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. काहीजण ...

The morcha will leave! Don't panic, don't believe the rumors | मोर्चा तर निघणारच ! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका

मोर्चा तर निघणारच ! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका

googlenewsNext

बीड : कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. काहीजण समाजात दुफळी तयार करण्याचं काम करीत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. त्यामुळे समाजाने लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. विनायक मेटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

काही जण हा मोर्चा आ. मेटे यांच्या आमदारकीसाठी असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवत आहेत; परंतु मी मागेही सांगितलं आहे आणि आजही तेच सांगतोय. आमदारकी मिळविण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न वेठीस धरण्याची मला अजिबात गरज नाही. मेटेंनी मराठा समाजासाठी आतापर्यंत जेवढं काम केलं आहे, त्याचे आशीर्वाद म्हणून मला आता कायमस्वरूपी आमदारकी मिळणारच आहे. हा लढा मराठा समाजातील गोरगरिबांच्या शिक्षणातील सवलतींचा, नोकरीसाठीच्या आरक्षणाचा आहे, असे आ. मेटे म्हणाले.

मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाचा पहिला लढा ज्यांनी उभारला ते स्व.आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे देखील नियोजनाच्या बैठका घेत आहेत. ज्यांचं बीड जिल्ह्यासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी काडीचंही योगदान नाही त्यांनी या मोर्चाला विरोध करण्याचं काम सुरु ठेवलं आहे. खासकरून काँग्रेस पक्ष इथे कोणालाही पाठवत असून त्यांनी केविलवाणा विरोध सुरु केलेला आहे. काँग्रेसने आतातरी मराठा आरक्षणाचा विरोध सोडावा. चिलटा चपाट्यांना पुढं करून अशोक चव्हाण या मोर्चाला विरोध करीत आहेत. माझं खुलं आव्हान आहे की, त्यांनी समोरासमोर येऊन खुला विरोध करावा, असेही आ.मेटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

आडवा आडवी केली तर आमच्याशी गाठ

मोर्चेकऱ्यांना प्रशासनाने आडवा आडवी करू नये. आम्ही प्रशासनासोबत सहकार्याची भूमिका घेत आहोत. कोरोनामुळे मोर्चेकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सबाबत आम्ही खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कोणीही मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये, कुणी जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवं येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही आ. मेटे यांनी दिला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघतील

आरक्षण न मिळण्यास या राज्य सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. जेव्हा जेव्हा न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडायची वेळ आली. त्या त्यावेळी आघाडी सरकारने भक्कमपणे बाजू मांडली नाही. मराठा समाजाच्या इतरही अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण झाल्या तर समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे. आज आ. मेटे बीडमध्ये पुढाकार घेत आहेत. राज्यभरात त्या त्या ठिकाणचे लोक पुढाकार घेऊन असेच मोर्चे काढतील. त्यामुळे एकटे आ. मेटे हिरो होतील ही मानसिकता बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असेही नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणाले.

===Photopath===

040621\04bed_10_04062021_14.jpg~040621\04bed_11_04062021_14.jpg

===Caption===

विनायक मेटे~नरेंद्र पाटील

Web Title: The morcha will leave! Don't panic, don't believe the rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.