धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणारे पाणी नद्यांना सोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:28+5:302021-05-06T04:35:28+5:30
यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आष्टी: सध्या काही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघातील ज्या धरणात ...
यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आष्टी: सध्या काही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघातील ज्या धरणात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे आणि धरणातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मागणी केली तर हे पाणी नद्यांतून सोडण्याची मागणी माजी आ. भीमसेन धोंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली.
सध्या आष्टी तालुक्यातील मेहकरी प्रकल्पात ७० टक्के पाणी साठा असून, धरणाच्या लाभक्षेत्रातील सराटेवडगाव, आनंदवाडी, रुईनालकोल, नांदा या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांचे सरपंच यांनी पाणी सोडावे, अशी आपणाकडे मागणी केलेली आहे. या गावांसाठी नदीद्वारे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अन्यथा टँकर सुरू करावे लागतील. बीड जिल्ह्यात नुकतेच माजलगाव प्रकल्पातील पाणी या प्रकारे त्या भागातील गावांसाठी सोडलेले आहे. मेहकरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र लोकरे यांना सूचना द्यावी, अशी मागणी माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली आहे.