पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकराचा विहीरीत पडून दुर्दैवी मुत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 02:51 PM2022-10-02T14:51:51+5:302022-10-02T14:52:04+5:30

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील दुर्दैवी घटना .

Mother and son fall down in well, both died on the spot | पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकराचा विहीरीत पडून दुर्दैवी मुत्यू

पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकराचा विहीरीत पडून दुर्दैवी मुत्यू

Next

कडा- घराला लागूनच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकारांचा विहिरीत पडून दुर्दैवी मुत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. वर्षा भगवान शेंडे(वय २२ वर्षे) आणि आर्यन भगवान शेंडे(वय २ वर्षे) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. 

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेंडेवस्तीवर राहत असेलेली वर्षा शेंडे शनिवारी रात्री आठच्या सुमारास पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली. तिच्यासोबत दोन वर्षाचा मुलगा आर्यन शेंडेदेखील होता. विहीरीतून पाणी शेंदताना त्यांचा तोल गेला आणि माय-लेक विहिरीत पडले. या घटनेत महिला आणि तिच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला. 

पती भगवान शेंडे हा कामाला गेल्याने उशिरा घरी आला. मुलगा व त्याची आई घरी नसल्याने इकडे तिकडे शोध घेतला असता विहीरीत पडल्याचे दिसून आले. अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, अंमलदार दत्ता टकले, प्रशांत कांबळे, शिवदास केदार, संतोष राठोड यांनी पंचनामा केला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: Mother and son fall down in well, both died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.