कासारीच्या सरपंचपदी आई, तर मुलगा उपसरपंच - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:01 AM2021-02-18T05:01:41+5:302021-02-18T05:01:41+5:30
धारूर : तालुक्यातील जागीर मोहा, रुईधारुर, कोथिंबीरवाडी, भोपा व कासारी या पाच ग्रामपंचायतींचे कारभारी मंगळवारी निवडण्यात आले. कासारीच्या ...
धारूर : तालुक्यातील जागीर मोहा, रुईधारुर, कोथिंबीरवाडी, भोपा व कासारी या पाच ग्रामपंचायतींचे कारभारी मंगळवारी निवडण्यात आले. कासारीच्या सरपंचपदी सुनंदा महादेव बडे तर उपसरपंच म्हणून त्यांचाच मुलगा सदाशिव महादेव बडे यांची वर्णी लागली. रुईधारुरच्या सरपंचपदी भागवत नाना गिरी, तर उपसरपंचपदी अर्चना बालासाहेब सोळंके यांची निवड झाली. भोपा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा अंकुश तिडके तर उपसरपंचपदी संगीता ईश्वर वाघचौरे यांची निवड झाली. कोथिंबीरवाडीच्या सरपंचपदी श्यामबाला युवराज वैराट तर उपसरपंचपदी विनोद ढोरे यांची निवड झाली. जागीर मोहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशाबाई संजय कांदे तर उपसरपंचपदी संगीता विजय सिरसट यांची निवड करण्यात आली. बहुतेक ग्रामपंचायतींचे कारभारी बिनविरोध निवडले गेले आहेत. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस. पी. गिरी, कृषी अधिकारी अमोल डाके, विस्तार अधिकारी अनिल चौरे, सहायक निबंधक एस. पी. नेहरकर, कृषी अधिकारी साहेबराव मुसळे यांनी काम पाहिले.