मातृदिनी दुर्दैवी घटना; बुडणाऱ्या मुलास वाचविण्यासाठी आईने नदीत उडी घेतली, दोघांचाही बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 02:03 PM2021-05-10T14:03:02+5:302021-05-10T14:08:00+5:30

Mother's Day unfortunate incident; : तोल जाऊन मुलगा नदीत पडला; क्षणाचाही विलंब न करता आईने वाचविण्यास उडी घेतली

Mother's Day unfortunate incident; The mother jumped into the river to save the drowning child, both of whom drowned | मातृदिनी दुर्दैवी घटना; बुडणाऱ्या मुलास वाचविण्यासाठी आईने नदीत उडी घेतली, दोघांचाही बुडून मृत्यू

मातृदिनी दुर्दैवी घटना; बुडणाऱ्या मुलास वाचविण्यासाठी आईने नदीत उडी घेतली, दोघांचाही बुडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआईसह पाच वर्षांच्या मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यूबीड जिल्ह्यातील घटना, खेळताना तोल गेल्याने घात

गेवराई (जि. बीड) : धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेला तिचा पाच वर्षांचा मुलगा नदीकाठी खेळत असताना त्याचा अचानक तोल गेला व तो नदीपात्रात पडला. यानंतर तो बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी आईने नदीपात्रात उडी घेतली. मात्र, या घटनेत आईसह मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे गोदावरी नदीपात्रात रविवारी सकाळी दहा वाजेदरम्यान घडली. पल्लवी गोकुळ ढाकणे (२६) व तिचा मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे (५, दोघे रा.संगम जळगाव) अशी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या माय-लेकाची नावे आहेत.

संगम जळगाव हे गोदावरी नदीकाठी असलेले गाव आहे. दरम्यान, पल्लवी ढाकणे या नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गोदापात्रात गेल्या होत्या. सोबत पाच वर्षांचा समर्थही गेला होता. पल्लवी या धुणे धुण्यात व्यस्त असताना नदीकाठी खेळणारा समर्थ अचानक पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला होता. यावेळी त्याला वाचविण्यासाठी पल्लवी ढाकणे यांनीदेखील गोदापात्रातील पाण्यात उडी मारली. दरम्यान, गोदापात्रात धुणे धुणाऱ्या काही महिलांनी आरडाओरड करीत गावाकडे धाव घेतली व मदत मागितली. मात्र, गावातील तरुण येईपर्यंत पल्लवी पल्लवीसह त्यांचा पाच वर्षांचा समर्थ या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.

मातृदिनी घडली घटना
रविवारी जागतिक मातृदिन होता. दरम्यान, या दिवशीच आपल्या चिमुकल्या मुलाला बुडताना पाहून स्वतःला पोहता येत नसतानादेखील पल्लवीने नदीपात्रात उडी घेऊन आपल्या पाच वर्षांच्या समर्थला वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र, या दुर्दैवी घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मातृदिनी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Mother's Day unfortunate incident; The mother jumped into the river to save the drowning child, both of whom drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.