आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:33+5:302021-09-27T04:36:33+5:30
बीड : पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत नेमाने वस्तीवरील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ओढ्यातून प्रवास, चिखलवाट तुडवत गावात दूध ...
बीड : पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत नेमाने वस्तीवरील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ओढ्यातून प्रवास, चिखलवाट तुडवत गावात दूध डेअरीवर जावे लागो. याबाबत वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. अखेर शनिवारी सकाळी आ. बाळासाहेब आजबे व आ. सुरेश धस यांच्या फोटोला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले.
पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत नेमाने वस्तीवरील शेतकऱ्यांचा दूध उत्पादन व विक्री हा प्रमुख व्यवसाय असून वस्तीवरील शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे १ किलोमीटर अंतरावरील वस्तीवर ओढ्यातून, चिखलवाट तुडवत जावे लागते. तसेच त्याठिकाणी असणारे खड्डे, आणि चिखल असल्याने ग्रामस्थांना शेतातून नवीन वाट तयार करावी लागली असून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे मागणी केली, परंतु कोणीच लक्ष दिले नाही. अखेर शनिवारी आ. बाळासाहेब आजबे आणि आ. सुरेश धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे, नामदेव नेमाने, निवृत्ती नेमाने,बळीराम नेमाने, अशोक नेमाने ,भागवत नेमाने, संतोष तांबे, गणेश तांबे, अशोक भाकरे, अंकुश नेमाणे, मारोती नेमाने, मुरलीधर नेमाने, रामहरी नेमाने, दत्तात्रय नेमाने, तुकाराम तांबे आदी सहभागी झाले होते.
250921\495325_2_bed_1_25092021_14.jpeg
तांबा राजुरी येथे आंदोलन करताना ग्रामस्थ दिसत आहेत.