महागाईच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:45+5:302021-08-23T04:35:45+5:30

बीड : केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल ...

Movement in Beed against inflation | महागाईच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन

महागाईच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन

Next

बीड : केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड तालुका महिला आघाडीच्यावतीने शनिवारी आंदोलन करून केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्ष निरीक्षक वैशाली पाटील, महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांच्या सूचनेवरून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्षा जयश्री वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा वनिता चाळक, जिल्हा सरचिटणीस राणी शेख, मिनाक्षी देवकते, मंगल जगताप, मंगल गाडेकर, ललिता शेरकर, विमल बडे, रिहाना पठाण, अमोल वाघमारे आदींची उपस्थिती होती.

220821\22_2_bed_4_22082021_14.jpg

बीडमध्ये आंदोलन

Web Title: Movement in Beed against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.