मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:07+5:302021-09-21T04:37:07+5:30
शांततामय मार्गाने कोविडचे नियम पाळून आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे उभारावे. ...
शांततामय मार्गाने कोविडचे नियम पाळून आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे उभारावे. काळवटी तलावाची उंची वाढविण्यात यावी. स्वाभी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावीत. बुट्टेनाथ साठवण तलाव तातडीने बांधावा. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढावा. घाटनांदूर ते अंबाजोगाई लोहमार्ग तयार करावा. परळी ते बीड रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.
या वेळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी मराठवाडा जनता विकास परिषद स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दामोदर थोरात, सचिव प्रा. रमेश सोनवळकर, शिवाजी खोगरे, ॲड. संतोष पवार, प्रा. सागर कुलकर्णी, प्रा. डॉ. भाऊराव मुंडे, दयानंद देशमुख, बाबूराव बाभुळगावकर, विलास काचगुंडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
180921\3531img-20210918-wa0053.jpg
आंदोलन