धारूर तालुक्यात आठ गावांत कंटेन्मेंट झोनच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:08+5:302021-05-12T04:34:08+5:30
धारूर : तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असून पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या आठ गावांत कंटेन्मेंट झोन लागू ...
धारूर
: तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असून पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या आठ गावांत कंटेन्मेंट झोन लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास हा उपाय प्रशासन करणार आहे. येथील गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी धारूर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहा गावांना कंटेन्मेंट झोन लागू करणे अनिवार्य असल्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे. रेपेवाडीत १४, कांदेवाडी १५, भोपा १७, पिंपरवाडा १७, चोरंबा २०, पहाडी दहिफळ २२, गोपाळपूर ३२, फकीर जवळा येथे ३२ रुग्ण असल्याचे समजते. या गावांना पूर्णच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.