आंदोलन; ६० किलोमीटर पदयात्रा काढून शेतकऱ्यांचा 'आक्रोश'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:10+5:302021-09-18T04:37:10+5:30

बीड : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी ...

Movement; Farmers' outcry over 60 km walk | आंदोलन; ६० किलोमीटर पदयात्रा काढून शेतकऱ्यांचा 'आक्रोश'

आंदोलन; ६० किलोमीटर पदयात्रा काढून शेतकऱ्यांचा 'आक्रोश'

googlenewsNext

बीड : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. त्यासाठी ६० किलोमीटर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. वडवणी तालुक्यातून निघालेली ही पदयात्रा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले.

अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खचला आहे. त्यांना धीर देण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, गतवर्षीचा थकीत खरीप पीकविमा तत्काळ वाटप करावा, ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांना ऑगस्ट २०१९ शासन अध्यादेशाप्रमाणे भरीव नुकसानभरपाई द्यावी, चालू वर्षीच्या पीकविमा योजनेतून २५ टक्के अग्रीम रक्कम तत्काळ वाटप करून १०० टक्के पीक विमा मंजूर करावा, विमा कंपनीकडून लादलेल्या जाचक अटी रद्द करून सरसकट भरपाई देण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री मुंडे यांना देण्यात आले. यावेळी अतुल झाटे, लहू गायकवाड, मुन्ना गोंडे, रामनाथ महाडिक, कैलास थोटे, महादेव गोंडे, माऊली आगे, उद्धव साबळे, परमेश्वर वीर आदी उपस्थित होते. १५ दिवसात प्रश्न निकाली निघाला नाही तर, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा करपे यांनी दिला आहे.

शासकीय पंचनाम्यानुसार मिळणार पीकविमा - मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मांडलेली अडचण सरकारला देखील ती सोडवायची आहे. येत्या १५ दिवसात ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांना शासकीय पंचनाम्यानुसार विमा रक्कम मिळेल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची घोषणादेखील लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

170921\17_2_bed_23_17092021_14.jpg

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी मोर्चाला संबोधीत करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे व इतर

Web Title: Movement; Farmers' outcry over 60 km walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.