आष्टीत एनआरसी विरोधात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:14 AM2020-02-05T00:14:19+5:302020-02-05T00:14:56+5:30

येथील ईदगाह मैदानावर आज एनआर सी विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे

Movement to hold anti-NRC | आष्टीत एनआरसी विरोधात धरणे आंदोलन

आष्टीत एनआरसी विरोधात धरणे आंदोलन

Next

आष्टी : येथील ईदगाह मैदानावर आज एनआर सी विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे
केंद्र सरकार भारताच्या संविधान विरोधी कायदे करत असून, यामुळे असहिंष्णुतेचे वातावरण निर्माण होत आहे. एन.आर.सी. व कॅब कायदे रद्द करावेत, नागरिकत्व संशोधन विधेयक हे केंद्र सरकारने संसदेमध्ये संमत केले आहे. या विधेयकामुळे एकाच समाजास लक्ष केंद्रीत करुन विधेयक पारीत झालेले आहे, तरी हे विधेयक केंद्र सरकारने रद्द करुन सर्वांसाठी एकच कायदा करावा, भारतीय राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष मूल्य जोपासावेत, यासाठी नागरिकत्व दुरूस्ती विधेयका विरोधात देशभरात उडालेल्या भडक्यानंतर आता महाराष्टातही असंतोष उफाळून येत असून, आष्टी येथे ईदगाह मैदान येथे धरणे आंदोलन सुरु झाले आहे. हे आंदोलन सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समस्त हिंदू-मुस्लिम बांधव आष्टी तालुकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Movement to hold anti-NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.