कामाच्या चौकशीसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:21 AM2019-02-09T00:21:47+5:302019-02-09T00:22:57+5:30
केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम पुन्हा करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील अंबाळाचे बरड या ठिकाणी रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक तासभरासाठी खोळंबली.
बीड : केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम पुन्हा करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील अंबाळाचे बरड या ठिकाणी रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक तासभरासाठी खोळंबली.
पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यावेळी म्हणाले, पिराचीवाडी या रस्त्याचा आठ दिवसांपूर्वी करण्यात आलेला कार्पेटस्तर उखडून गेला आहे. हे काम रद्द करु न पुन्हा करावे. तसेच या मार्गावरील रस्त्याची कामे जुनी आहेत. घाटामध्ये संरक्षण भिंतीचे काम दुसऱ्यांदा करण्यात यावे, केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम दुसºयांदा करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. वेळोवेळी कार्यकारी अभियंत्यांना काम निकृष्ट होत असल्याची माहिती दिली. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे निकृष्ट काम करणाºयांची चौकशी करु न कारवाई करावी तसेच या मार्गाचे दुसºयांदा काम करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी.
तासभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मागणीचे निवेदन पोलिसांमार्फत जिल्हाधिकाºयांना देण्यात आले होते. निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
तासभर वाहतूक ठप्प
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे.
या कामाची चौकशी करुन सदरील रस्ता पुन्हा करावा या मागणीसाठी करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक तासभरासाठी ठप्प झाली होती.