खरीप पीकविम्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:01 AM2019-08-09T00:01:17+5:302019-08-09T00:02:18+5:30
गतवर्षी भरलेला खरिपाचा पीकविमा सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने बीडमधील ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
बीड/धारूर : गतवर्षी भरलेला खरिपाचा पीकविमा सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने बीडमधील ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी कंपनीविरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
गेवराई तालुक्यातील शेतकºयांनी खरिपाचा विमा भरला. निकषाप्रमाणे सर्व कागदपत्रेही जोडली. विमा मंजुरही झाला. मात्र, अद्यापही तो शेतकºयांच्या खात्यावर जमा झाला नाही. याबाबत वारंवार कृषी विभाग व ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीकडे वारंवार विचारणा केली. परंतु कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी गुरूवारी सकाळी बीडमधील कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन कंपनीचे शाखाधिकारी मिलींद ताकपेरे यांना देण्यात आले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या प्रश्नी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्वरित कारवाई करून शेतकºयांना विनाविलंब पीक विमा रक्कम अदा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सोयाबीन पीकविम्यासह विविध मागण्या : धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको
धारूर : जिल्ह्यातील उर्वरित शेतकºयांना सोयाबीनचा पीक विमा तात्काळ वाटप करावा, परळी -अंबाजोगाई रस्ता लवकर पूर्ण करावा, वैद्यनाथ कारखान्याच्या शेतकºयांचे ऊस बिल तात्काळ अदा करावे यासह इतर मागण्यांसाठी परळी येथे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ठिय्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येथील शिवाजी महाराज चौकात रास्ता आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांतर्फे तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे, सुरेश फावडे, न.प. गटनेते सुधीर शिनगारे, ग्रा.पं. सदस्य कैलास बोरगावकर, प्रदीप नेहरकर, सखाराम सिरसट, श्रीकृष्ण सिरसट, अशोक सिरसट, गणेश डापकर, कैलास चव्हाण, बालाजी गांधले, विठ्ठल काळे,भागवत शिनगारे, राहुल चव्हाण, नेताजी सोळंके, बाबूराव गायकवाड, भाऊसाहेब बांगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. दोन्ही बाजंूची वाहतूक या आंदोलनामुळे काही काळ ठप्प झाली होती.