भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:04 IST2023-09-07T15:03:55+5:302023-09-07T15:04:29+5:30
मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला

भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन
परळी : मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात यावेत, या मागण्यांसाठी नागापूर येथील वाण धरणाच्या काठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज ( दि.०७ ) दुपारी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाने प्रशासनास निवेदनाद्वारे दिला.आरक्षण आमच्या हक्काचे ,नाही कोण्याच्या बापाचं, जय जिजाऊ ,जय शिवराय ,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत भरपावसात आंदोलन सुरु आहे. धरण परिसरात परळी ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त आहे.