कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:14 AM2019-01-12T00:14:46+5:302019-01-12T00:15:27+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जायकवाडी वसाहतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासामोर बेरोजगार तरु णांना कर्ज मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.

Movement of self-respecting organization to remove loan proposals | कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

Next
ठळक मुद्देअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महांमडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जायकवाडी वसाहतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासामोर बेरोजगार तरु णांना कर्ज मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे व आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकेत दाखल केलेले कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले असून प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे तसेच कर्जवाटपाबाबत बॅँका उदासीन असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
या आंदोलनात बीड (पक्ष) जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि. कोषाध्यक्ष धनंजय मुळे, डॉ. अभिजित महेंद्रवाडीकर, अ‍ॅड. विशाल कदम, संग्राम शिंदे, डॉ. माऊली राख, अशोक भोसले, श्रीनिवास भोसले, राजेंद्र डाके पाटील, उध्दव साबळे, वशिष्ठ बेडके, प्रमोद पांचाळ, तुकाराम महारनोर, नंदू शिंदे, अशोक वानखेडे, पद्माकर शिंदे, भीमराव तपसे, रमेश शेवाळे, राहुल मुळे, अशोक सोनवणे आदी शेकडो युवक व पदाधिकारी सहभागी होते.

Web Title: Movement of self-respecting organization to remove loan proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.