स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुक्रवारपासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:45 AM2019-01-10T00:45:44+5:302019-01-10T00:46:30+5:30
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत राज्यात मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो रुपये खर्च करुन आॅनलाईन कर्ज प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून मोठया प्रमाणात दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत राज्यात मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो रुपये खर्च करुन आॅनलाईन कर्ज प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून मोठया प्रमाणात दाखल केले आहेत. मात्र बीड जिल्ह्यासाठी फक्त ३०० प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट आल्यामुळे अनेक तरुण वंचित राहणार आहेत, या धोरणाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड येथील महामंडळ कार्यालयापुढे शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे दोन वेळा बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास २ हजार तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईल अर्ज केले आहेत. मात्र जिल्ह्यासाठी फक्त ३०० कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट आल्यामुळे अनेकांना योजनेपासून वंचीत राहवे लागणार आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारपासून महामंडळ कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे यांनी दिली.
या आंदोलनात सर्व बेरोजगार तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जि.कोषाध्यक्ष धनंजय मुळे, मचिंद्र गावडे, डॉ अभिजीत महेंद्रवाडीकर, डॉ. माऊली राख ,संग्राम शिंदे, भरत मुळे, सुग्रीव करपे, दिलिप तपसे, राहुल मुळे, हर्षद मुळे, दत्ता करपे, पद्माकर शिंदे, माणिक गरड, रमेश शेवाळे, अभिजीत ठोले आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले
आहे.