बीड जिल्ह्यात ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:41 AM2018-12-18T00:41:20+5:302018-12-18T00:41:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून ग्रामरोजगार सेवक या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. २४ तारखेपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमूदत कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला.
प्रतिमाह १८,००० रुपये वेतन लागू करावे, मानधन वैयक्तीक खात्यावर जमा करावे, २६ फेब्रुवारी २०१३ पासून टीए, डीए द्यावा. कायमस्वरुपी नियुक्ती पत्र द्यावे, त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय विमा काढावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर खांडे, सचिव बाबासाहेब सोनवणे, गेवराई तालुकाध्यक्ष चाळक, जालिंदर शेजुळ, बीडचे अंगद खवतड, अंबाजोगाईचे कांगणे, चंद्रकांत काचगुंडे, संतोष दराडे, सिताप मधुकर, केजचे जाधव विष्णू, भगवान केदार, मुकादम, माजलगावचे श्रीकृष्ण मते, धारुरचे विलास गवळी, वडवणी आगे, जयदेव खाडे, शिरुर तालुकाध्यक्ष एकनाथ गर्जे, काटे, आष्टीचे मनोहर सरवदे, आंधळे, परळीचे बाळासाहेब कराड, हनुमंत गिते, सोपान होळंबे, पाटोद्याचे पोपटराव राख, तुकाराम येवले, जिल्हा कोषाध्यक्ष राम शिंदे, श्रीराम जगतापसह शेकडो ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले होते.
परळीतील आंदोलनाला अनेकांचा जाहीर पाठिंबा
परळी : ग्रामरोजगार सेवकांना इत्तर राज्याप्रमाणे शासकीय सेवेत समाऊन घेणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या घेऊन राज्यातील विविध पंचायत समिती समोर बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन १७ डिसेंबर पासून सुरू केले आहे. या आंदोलनाला पंचायत समिती सभापती मोहन सोळके,उपसभापती बालाजी मुंडे तसेच महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपान होळबे, तालुकासचिव शिवाजी मुंडे,तसेच नवनाथ पारवे, प्रकाश अंभुरे, संजय फड, राम पवार, गोविंद राख, संगणक परिचालक संघटनेचे वैजनाथ माने, धोंडीराम बांगर, तसेच तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.