अकरा गावांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे धरणात उतरून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:21 PM2017-09-23T13:21:03+5:302017-09-23T13:21:42+5:30
शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव(बीड), दि. 23 : शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
माजलगाव धरणाचा पाया ज्या ११ गावाचा मालमत्ते वर उभा आहे आज त्याच पुनर्वसित गावच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. माजलगाव नगर परिषद व ११ गावच्या ग्राम पंचायत यांच्यात पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चावरून वाद सुरु आहेत. यामुळे मागील 20 दिवसांपासुन या गावांचा पाणीपुरवठा नगर परिषदेने बंद केला आहे. पाणीपुरवठा सुरूळीत करा या मागणीसाठी रेणापुरी, शेलापुरी, ब्रह्मगाव, चिंचगव्हान, काडीवडगाव,नागझरी, नांदुर खानापुर, या सह ११ पुनर्वसत गावांनी 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग 222 वर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जलसमाधी घेण्याचा प्रशासनास इशारा दिला होता. पंरतु अद्याप प्रशासन व न.प.पाणीपुरवठा सुरुळीत न करुन आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले.
यामुळे या गावचे ग्रामस्थ मुक्तीराम आबुज,गणेश मारगुडे, शिवाजी आबुज, विनोद आबुज,पंडीत आबुज,पांडुरंग आबुज, पवण मुळे, विकास कांबळे, आनिल कांबळे, गोविंद चांभारे, गोरख आबुज, सचिन आबुज, सोमेश्वर आबुज, धनंजय आबुज यांनी माजलगाव धरणात उतरून न.प.व प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनकर्त्यानी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासन व गटविकास आधिकारी चव्हाण यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्याना समजावून सांगत धरणातुन बाहेर काढून तहसील कार्यालयात चर्चेसाठी आणले आहे.