परळीच्या दारूविक्रेत्यावर एमपीडीए कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:53 AM2018-12-25T00:53:55+5:302018-12-25T00:54:15+5:30
हातभट्टी दारु तयार करुन तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हातभट्टी दारु तयार करुन तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला स्थानबद्ध करुन त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कारवाई करण्यात आली. ही कारवाई सोमवारी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली.
गोविंद सखाराम राठोड (रा. धारावती तांडा, ता. परळी) असे दारु विक्रेत्याचे नाव आहे. परळी तालुक्यात त्याने दारु विक्री करणे, ताब्यात बाळगणे आणि तरुणांना व्यसनाधीन करण्याचे प्रकार केले होते. हाच धागा पकडून परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी त्याचा एमपीडीए संदर्भात प्रस्ताव तयार केला.
उप विभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी चौकशी केली. त्यानंतर तो पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला. यावर श्रीधर यांनी एमपीडीए कारवाई करुन त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उप अधीक्षक सुरेश गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीणचे पो. नि. सुरेश चाटे, स. पो. नि. मारुती शेळके, पो. उप नि. कांबळे, आडे आदींनी केली.