माजलगावातील दोन गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:01 PM2018-10-18T12:01:08+5:302018-10-18T12:02:00+5:30
माजलगाव शहरासह तालुक्यात दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली
बीड : माजलगाव शहरासह तालुक्यात दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांवर एमपीडीए कारवाई करून त्यांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गुरूवारी केली.
शेख जहीर शेख कदीर (३४ हनुमान चौक, माजलगाव) व दिपक कांबळे (२६ ब्रम्हगाव ता.माजलगाव) अशी कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. जहीरवर मारामारी, जुगार, धमकी देणे, रस्त्यात अडविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर दीपकविरोधात घरफोड्या, दरोडे, चाकुचा धाक दाखवून लुटणे, अवैध शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.
या दोघांविरोधात माजलगाव शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. महाजन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. याला मंजूरी मिळताच दोघांच्याही मुसक्या आवळून त्यांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहत रवानगी करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि महाजन व माजलगाव शहर ठाण्यातील अधिकारी, कर्मचा-यांनी केली.