MPSC Exam: उपशिक्षणाधिकारी परीक्षेत बीडचे दत्तात्रय लांडगे महाराष्ट्रात प्रथम

By अनिल भंडारी | Published: September 12, 2023 07:00 PM2023-09-12T19:00:46+5:302023-09-12T19:01:22+5:30

२०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली होती परीक्षा 

MPSC Exam: Dattatraya Landge of Beed tops in Maharashtra in Deputy Education Officer Exam | MPSC Exam: उपशिक्षणाधिकारी परीक्षेत बीडचे दत्तात्रय लांडगे महाराष्ट्रात प्रथम

MPSC Exam: उपशिक्षणाधिकारी परीक्षेत बीडचे दत्तात्रय लांडगे महाराष्ट्रात प्रथम

googlenewsNext

बीड :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट ब मर्यादित उपशिक्षणाधिकारी  पदाच्या विभागीय स्पर्धा परीक्षेत बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण  विभागातील दत्तात्रय शिवाजी लांडगे यांनी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक 
पटकावला आहे. 

२०१७ मधील उपशिक्षणाधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल ११  सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित केला आहे. लांडगे हे सध्या बीड जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागात विज्ञान पर्यवेक्षक तथा सहायक योजना अधिकारी  म्हणून कार्यरत आहेत.  धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील ते रहिवासी आहेत. दत्तात्रय लांडगे यांचे शालेय, महाविद्यालयीन व बी.एडचे शिक्षण धारशिव जिल्ह्यात झाले असून  पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले झाले आहे. यापूर्वी ते नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते. सध्या ते बीड येथील माध्यमिक शिक्षण विभागात विज्ञान पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहेत.

उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल दत्तात्रय लांडगे यांचे  जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक, शिक्षणाधिकारी माध्यमिक  नागनाथ शिंदे, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी , शिक्षणाधिकारी योजना व डायटचे  प्राचार्य डॉ. विक्रम सारुक, जिल्ह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, मोहन काकडे, काजी, मैना बोराडे, अजय बहीर तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी,  शिक्षण विस्तार अधिकारी व सर्व केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Web Title: MPSC Exam: Dattatraya Landge of Beed tops in Maharashtra in Deputy Education Officer Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.