महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:01+5:302021-02-11T04:36:01+5:30

येथील हबीबपुरा भागातील विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसांपासून करंट उतरत असल्याचे नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार कळवले. ...

MSEDCL officials file case against employees | महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

येथील हबीबपुरा भागातील विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसांपासून करंट उतरत असल्याचे नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार कळवले. मात्र, ही दुरुस्ती केली नसल्याने गौरी वैजनाथ घोटकर (६) ही या खांबाच्या संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेनंतर या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. महावितरणच्या गलथान कारभाराने या मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची चीड नागरिकांनी व्यक्त केली. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी व गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यानंतर परळी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी वैजनाथ विठ्ठलराव घोटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. मोहन जाधव हे तपास करीत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री येथील स्मशानूमीत भूमीत गौरी घोटकर हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: MSEDCL officials file case against employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.