महावितरण कर्मचारी फिरत राहिले, गावकऱ्यांनी शोधला ‘फॉल्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:32+5:302021-05-22T04:31:32+5:30

धारूर : तालुक्यातील हिंगणी येथील विद्यूत पुरवठा होणाऱ्या फिडरवर आलेल्या अडचणींमुळे दहा ते अकरा गावांचा वीज पुरवठा ...

MSEDCL staff roams, villagers find fault | महावितरण कर्मचारी फिरत राहिले, गावकऱ्यांनी शोधला ‘फॉल्ट’

महावितरण कर्मचारी फिरत राहिले, गावकऱ्यांनी शोधला ‘फॉल्ट’

Next

धारूर : तालुक्यातील हिंगणी येथील विद्यूत पुरवठा होणाऱ्या फिडरवर आलेल्या अडचणींमुळे दहा ते अकरा गावांचा वीज पुरवठा बंद होता. महावितरणकडे मागणी करूनही दुरूस्ती होत नव्हती. महावितरणचे कर्मचारी फॉल्ट शोधत हिंगणीसह लगतच्या गावात फिरत होते. मात्र हिंगणी येथील युवकांनी पुढाकार घेत बंद पडलेला वीज पुरवठा सुरळीत केला. हिंगणीचा पुरवठा सुरळीत होताच अन्य गावांतही दुसऱ्या दिवशी विजेचा प्रश्न मार्गी लागला.

दोन दिवसांपासून हिंगणी फिडरपासून ११ गावांच्या विद्यूत वाहिनीत फॉल्ट होता. झाडांच्या फांद्या व इन्सुलेटर खराब असल्याने या सर्व गावचा विद्युत पुरवठा बंद होता. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत होते. तक्रारी वाढल्यानंतर विद्युत वाहिनीच्या मार्गावरील गावांत कर्मचारी फॉल्ट शोधत होते परंतू सापडत नव्हता. मुख्य वाहिनीचा विद्युत पुरवठा बंद असल्याचे लक्षात घेत हिंगणीचे उपसरपंच योगेश सोंळके, बाळराजे सोळंके,अशोक तंबूड, कल्याण हावेले, कोयाळचे महादेव मुंडे व इतर तरूणांनी मिळून झाडांच्या फांद्या तोडून विद्युत खांबावर चढुन फॉल्ट शोधून विद्यूत पुरवठा सुरळीत केला. महावितरणने कायम स्वरूपी हा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्याआधी वीजप्रश्न मार्गी लावू

हिंगणी भागातील विजेचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी महावितरणकडून आवश्यक त्याठिकाणी विद्युत दुरूस्तीचे काम करण्यासाठी नियोजन केले जाईल. संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत सुचना देण्यात येतील.- धर्मपाल थुल, उप कार्यकारी अभियंता, तेलगाव.

===Photopath===

210521\fb_img_1621527827139_14.jpg~210521\fb_img_1621527823304_14.jpg

Web Title: MSEDCL staff roams, villagers find fault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.