Mucormycosis : ‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारांच्या बळकटीकरणासाठी 'स्वाराती’रुग्णालयाला ८८ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:28 PM2021-06-08T19:28:55+5:302021-06-08T19:30:15+5:30

एंडोस्कोपी युनिट, १९ सिरिंज इन्फ्युजन पंपा खरेदीसाठी होणार वापर

Mucormycosis : SRT Hospital from Ambejogai gets Rs 88 lakh for strengthening treatment for Mucormycosis | Mucormycosis : ‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारांच्या बळकटीकरणासाठी 'स्वाराती’रुग्णालयाला ८८ लाखांचा निधी

Mucormycosis : ‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारांच्या बळकटीकरणासाठी 'स्वाराती’रुग्णालयाला ८८ लाखांचा निधी

Next
ठळक मुद्दे‘म्युकरमायकोसिस’वरील सर्जरीसाठी होणार मदत

अंबाजोगाई : पोस्ट कोविड उपचारांमध्ये म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास पालकमंत्री  धनंजय मुंडेंनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोर १९ सिरिंज इन्फ्युजन पंप खरेदी करण्यासाठी असे मिळून ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करताना आवश्यक एंडोस्कोपी सर्जरी करण्यासाठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट अत्यंत लाभदायक असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारात ४२,७८२ युएस डॉलर्स इतकी किंमत आहे. या युनिटसह ९.३६ लाख रुपये किंमतीचे १९ इन्फ्युजन पंप खरेदीसाठी एकूण ८८ लाख रुपये निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे  यांनी दिली आहे.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ९० रुग्णांवर ११५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, बीड सह, नांदेड, उस्मानाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यातून देखील या आजाराचे रुग्ण येथे उपचार घ्यायला येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे स्वाराती हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सुधीर भिसे यांच्यासह या विभागातील सर्व निवासी डॉक्टरांच्या नेतृत्वात म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील या सर्वच टीमचे  धनंजय मुंडे यांनी स्वागत  केले आहे.

म्युकरमायकोसिसवरील उपचारांना मिळणार बळ
धनंजय मुंडे यांनी एंडोस्कोपी सायनो सर्जरी साठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट सारखे आधुनिक उपकरणे प्राप्त करून दिल्यामुळे म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारांना आणखी बळकटी व वेग येणार असल्याचे स्वाराती चे अधिष्ठाता डॉ.शिवाजी  सुक्रे यांनी म्हटले आहे.

Web Title: Mucormycosis : SRT Hospital from Ambejogai gets Rs 88 lakh for strengthening treatment for Mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.