मुक्ताईंच्या पालखीला अपघात; चार महिला वारकरी जखमी, रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 10:45 AM2023-06-19T10:45:30+5:302023-06-19T10:46:16+5:30

रात्री उशिरा मोरगाव फाट्यावर मुक्ताईंच्या पालखीने विसावा घेतला होता.

Muktai's palanquin accident; Four women injured, admitted to hospital, condition stable | मुक्ताईंच्या पालखीला अपघात; चार महिला वारकरी जखमी, रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

मुक्ताईंच्या पालखीला अपघात; चार महिला वारकरी जखमी, रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

googlenewsNext

बीडमधून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या मुक्ताईंच्या पालखीला अपघात झाला. या अपघातात चार महिला वारकरी जखमी झाल्या. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

रात्री उशिरा मोरगाव फाट्यावर मुक्ताईंच्या पालखीने विसावा घेतला होता. याच दरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या मोटार सायकलने पालखीला धडक दिली. यामध्ये चार महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आपली टीम तैनात ठेवली. हे रुग्ण दाखल होताच त्यांना प्रथमोपचार करण्यात आले. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Muktai's palanquin accident; Four women injured, admitted to hospital, condition stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.