वडवणीच्या नगराध्यक्षपदी मुंडे, उपनगराध्यक्षपदी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:36 AM2018-05-26T00:36:59+5:302018-05-26T00:36:59+5:30

Munde is the city president of Vadwani, Pawar is the deputy chief of the party | वडवणीच्या नगराध्यक्षपदी मुंडे, उपनगराध्यक्षपदी पवार

वडवणीच्या नगराध्यक्षपदी मुंडे, उपनगराध्यक्षपदी पवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : नगरपंचायतच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या मंगल राजाभाऊ मुंडे तर उपनगराध्यक्षपदी कमल राजेभाऊ पवार यांची बिनविरोध निवड झाली.
येथील नगरपंचायतमध्ये १७ नगरसेवक, तर २ स्वीकृत नगरसेवक असे एकूण १९ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे ६, अपक्ष २, शिवसेना १ असे संख्याबळ आहे.

शुक्रवारी दुपारी नगरपंचायातच्या विशेष सभेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी एक एक अर्ज प्राप्त झाला. भाजपकडून मंगल मुंडे यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदी कमल पवार यांची बिनविरोध निवड झाली. सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांनी काम पाहिले.

Web Title: Munde is the city president of Vadwani, Pawar is the deputy chief of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.