परळीत मुंडे प्रतिष्ठानचे होम आयसोलेशन सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:54+5:302021-05-04T04:14:54+5:30

परळी : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी शहरात सुरू आयसोलेशन सेंटर व घरपोच मोफत भोजन व्यवस्थेचा ...

Munde Pratishthan's Home Isolation Center started in Parli | परळीत मुंडे प्रतिष्ठानचे होम आयसोलेशन सेंटर सुरू

परळीत मुंडे प्रतिष्ठानचे होम आयसोलेशन सेंटर सुरू

Next

परळी : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी शहरात सुरू आयसोलेशन सेंटर व घरपोच मोफत भोजन व्यवस्थेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या सेंटरमध्ये सोमवारपासून रूग्णसेवेला प्रारंभ झाला आहे.

दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शंभर बेड क्षमतेचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. १ मे पासून यासाठी नोंदणी सुरू झाली होती. गेल्या दोन दिवसांत नोंदणी झालेले २५ रुग्ण, लक्षणे नसलेले कोरोना बाधित रूग्ण सेंटरमध्ये भरती झाले असून तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखीत मोफत औषधोपचार, भोजनासह त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच जेवणाची देखील व्यवस्था सुरू झाली आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे व दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेस भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर ऑनलाईन उदघाटन झाले. डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड,

डाॅ. एल.डी. लोहिया, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. दुष्यंत देशमुख, डाॅ. दीपक पाठक, डाॅ. वाल्मिक मुंडे, डाॅ. आनंद मुंडे यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन ॲड. अरूण पाठक यांनी केले तर उमेश खाडे यांनी आभार मानले.

सेंटरमध्ये काम करणारे सर्व डाॅक्टर्स, परिचारिका, कर्मचारी तसेच सेवा यज्ञात सहभागी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःची काळजी घेऊन रुग्णसेवा करावी. सेंटरमध्ये आलेल्या रूग्णांची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि त्यांना कोरोना मुक्त करावे अशी सूचना पंकजा मुंडे यांनी केली.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी शहरात सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली.

===Photopath===

030521\03bed_6_03052021_14.jpg

===Caption===

परळीत मुंडे प्रतिष्ठानचे होम आयसोलेशन सेंटर सुरू

Web Title: Munde Pratishthan's Home Isolation Center started in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.