मुंडे -क्षीरसागर नारायणगडावर एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:46 PM2019-07-12T23:46:53+5:302019-07-12T23:48:44+5:30

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू केली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी खुलासा करताना यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट सांगितले.

Munde-Sakharsagar collects on Narayanagad | मुंडे -क्षीरसागर नारायणगडावर एकत्र

मुंडे -क्षीरसागर नारायणगडावर एकत्र

Next
ठळक मुद्देपंकजा मुंडे : उद्धव ठाकरे माझे बंधू, मला कसे अडचणीत आणतील ? आमच्यात कोणतेही वाद नाहीत

बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू केली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी खुलासा करताना यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून या दोघांत वाद निर्माण झाल्याच्या चर्चेने धुराळा उडाला होता. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, गड हे भाविकांचे आहेत, ते तसेच राहू द्या. श्रेयवादासाठी गडाला राजकारणामध्ये ओढू नका. गडांना राजकारणात ओढाल तर वाट लागेल, असे आवाहन करत बीड जिल्ह्यातील जनतेने राजकीय अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. आमचे कोणासोबत कोणतेही वाद नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे भाऊ आहेत. क्षीरसागरांना शिवसेनेत घेतांना त्यांनी मला विचारले होते. ते बहिणाला कसे अडचणीत आणतील, असा विश्वासही त्यांनी नारायणगडावर व्यक्त केला. जनतेला विकासाचा शब्द दिला आहे आणि तो पाळणार आहोत. आता न मागता मिळेल, असे म्हणत ‘आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाहीत.मी लोकांच्या दहा वेळा पाया पडेल पण मतासाठी कुणाच्या पाया पडणार नाही’ असेही त्या म्हणाल्या.
धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गडाला मोठा इतिहास आणि अध्यात्मिक वारसा आहे, म्हणूनच येथे लाखो भाविकांची गर्दी असते. भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, अठरा पगड जातीचे भाविक येथे येतात, नारायणगड हे प्रेरणास्थळ आणि शक्तीस्थळ असल्याचे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले. यावेळी मठाधिपती महंत शिवाजी महाराज उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक गडाचे विश्वस्त दिलीप गोरे यांनी केले तर विस्वतांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आला. कार्यक्र माला व्यासपीठावर महंत शिवाजी महाराज, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आ बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कूंडलीक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शालिनी कराड, कल्याण आखाडे, राजेंद्र मस्के, विलास बडगे, अरुण डाके, दिनकर कदम आदी उपस्थित होते.
नारायणगड हे प्रेरणास्थळ : जयदत्त क्षीरसागर
जयदत्त क्षीरसागर आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले आज नारायणगडावर भक्तीचा महापुर आला आहे. नारायणगड हे प्रेरणास्थळ आणि शक्तीस्थळ आहे.पंढरीच्या पांडूरंगाला नारायणगडावरु न पाहिले जाते.
देवाच्या दारात उभे राहिले तरी पुण्य पदरात पडते.म्हणूच वारी परत फिरतांना बळीराजाचे आगमन होते. आजून चागंला पाऊस पडू दे हेच विठ्ठलाच्या चरणी मागणे आहे. तो भक्तांसाठीच उभा आहे.
बीड जिल्ह्याने कधीच जातपात पाळली नाही. विकासाला साथ दिली, माणसे जोडणारी माणसे आम्हाला हवी आहेत.गतवेळी मी आमदार म्हणून आलो आज नामदार म्हणून येथे आलो आहे ते केवळ आपल्या आशीर्वादाने असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

Web Title: Munde-Sakharsagar collects on Narayanagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.