मुंडे बहिण-भाऊ बिनविरोध पण दोघांच्या पॅनलमध्ये चुरसीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 07:22 PM2023-04-19T19:22:23+5:302023-04-19T19:22:48+5:30

एकूण 34 जागे पैकी दोन जागा बिनविरोध निघाल्याने 32 जागेसाठी सहा मे रोजी मतदान होणार आहे

Munde sister-brother unopposed but a tough match in the panel of both | मुंडे बहिण-भाऊ बिनविरोध पण दोघांच्या पॅनलमध्ये चुरसीचा सामना

मुंडे बहिण-भाऊ बिनविरोध पण दोघांच्या पॅनलमध्ये चुरसीचा सामना

googlenewsNext

- संजय खाकरे
परळी (बीड) :
माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली असली तरी इतर जागांसाठी निवडणूक होणार आहे. या दोघांचे चुलत भाऊ व आ. धनंजय मुंडे पॅनलचे उमेदवार अजय मुंडे यांना व माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांच्यासह इतर दिग्गजांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विषेध म्हणजे, दोघे बहिण-भाऊ बिनविरोध निवडून आले असले तरी आता दोघांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार आहे.  निवडणुकीच्या रिंगणात आहे. 

जवाहर एज्युकेशन  सोसायटीच्या संचालकपदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी एकूण बारा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. एकूण 34 जागे पैकी दोन जागा बिनविरोध निघाल्याने 32 जागेसाठी सहा मे रोजी मतदान होणार आहे, सहाय्यक सभासद गटात एका जागे करिता तर तहहयात गटातील  31 जागेसाठी निवडणुक होत आहे. 

सहाय्यक सभासद गटात एका जागेसाठी 3 उमेदवार तर तहहयात गटातील  31 जागेसाठी 67 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे  दोन पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज  मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी हितचिंतक सभासद गटातून एका जणांनी तर तहहयात गटातून 11 जणांनी आपले 26 उमेदवारी अर्ज मागे घेतले. या गटात एकूण 93 उमेदवारी अर्ज दाखल होते त्यामुळे आता 67 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत तर सहाय्यक गटात एका जागेसाठी तिघांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत  त्यामध्ये कुंडलिकराव मुंडे,अजय मुंडे,रविंद कांदे यांचा समावेश आहे. 

तर आश्रयदाता सभासद गटातून आमदार धनंजय मुंडे तर हितचिंतक सभासद गटातून माजी मंत्री पंकजा मुंडे या बिनविरोध निवडून आले आहेत. तहहयात गटातील 11 जणांचे 26 उमेदवारी अर्ज मागे घेतले. तरुणांना संधी द्यायला हवी अशी प्रतिक्रिया परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापतीबंकटराव कांदे यांनी दिली. 

दिग्गज निवडणूक रिंगणात
जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी माजी राज्य  मंत्री पंडितराव दौंड ,ज्येष्ठ नेते प्रा टीपी मुंडे ,एस टी महामंडळाचे माजी संचालक फुलचंद कराड, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव दत्तापा इटके ,माजी मंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अजय मुंडे यांच्या सह इतर उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारांची अंतिम यादी 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून द.ल. सावंत हे काम पाहत आहेत त्यांना ललित बोंडे यांचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: Munde sister-brother unopposed but a tough match in the panel of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.