पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:07+5:302021-04-19T04:31:07+5:30
बीड : शहरासह हद्दवाढ भागात पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी सर्वच ...
बीड : शहरासह हद्दवाढ भागात पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी सर्वच जलशुद्धिकरण केंद्र व पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी भेटी देत आढावा घेतला तसेच सुरळीत पाणीपुरवठा करण्याबात यंत्रणेला सूचना केल्या. रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला.
शहरातील व शहराच्या हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने याबाबत नागरिकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या. यावर आ. क्षीरसागर यांच्या सूचनेवरून हेमंत क्षीरसागर रविवारी सकाळीच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ईदगाह नाका, नाळवंडी नाका पाणी टाकीवर जाऊन पाणी प्रश्नांचा आढावा घेतला तसेच रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा, त्यात कसलाही व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या, पाणीपुरवठा करताना कोणी हलगर्जीपणा केल्यास त्यावर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही हेमंत क्षीरसागर यांनी दिला. यावेळी नगरसेवक बिभीषण लांडगे, विशाल घाडगे, शेख मुजीब, शेख रहीस, पाणीपुरवठा अभियंता राहुल टाळके, कर्मचारी पी. आर. दुधाळ आदींची उपस्थिती होती.
आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर वाढवा
सध्या मुस्लिम समाजबांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. अशावेळी पाण्याची मागणी वाढते तसेच उन्हाळा असल्याने हद्दवाढ भागात पाणी टँकर देण्यात यावे, अशी मागणी होते. यावेळी आवश्यकतेनुसार पाणी टँकर वाढविण्याचे निर्देश उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दिले आहेत.
===Photopath===
180421\18_2_bed_15_18042021_14.jpeg
===Caption===
जलशुद्धीकरण केंद्राचा आढावा घेताना उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर. साेबत अभियंता राहुल टाळके, पी.आर.दुधाळ आदी.