नगरपालिकेने खरेदी केले पी.पी.ई.किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:25+5:302021-04-08T04:33:25+5:30
माजलगाव : कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांचा मृतदेह पॅक करण्यासाठी व अंत्यविधी करणा-यांना लागणारे पी.पी.ई. किट खरेदी न ...
माजलगाव : कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांचा मृतदेह पॅक करण्यासाठी व अंत्यविधी करणा-यांना लागणारे पी.पी.ई. किट खरेदी न केल्यामुळे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार वेळेवर होत नव्हते. आरोग्य विभागाकडून ही कीट घेऊन वेळ भागवून घेण्याचा प्रकार नगरपालिकेकडून होत असल्याचा ‘लोकमत’ने भांडाफोड करताच नगरपालिकेने तत्काळ किट विकत घेतले.
शासनाने गेल्यावर्षीच लाॅकडाऊन पडताच नगरपालिकेला प्रस्ताव न घेता कोरोनाबाबत लागणारे साहित्य खरेदी करण्याची मुभा दिली होती. परंतु, येथील नगरपालिकेने कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला लागणारे साहित्य व रुग्णांचा मृतदेह पॅक करण्यासाठी व अंत्यविधी करणा-यांना लागणारे पी.पी.ई.किट खरेदी करणे आवश्यक होते. परंतु, नगरपालिकेने कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यांच्याच नातेवाइकांकडून अंत्यविधीला साहित्य घेतले जात होते. मृतदेह पॅक करण्यासाठी व अंत्यविधी करणाऱ्यांना लागणारे पी.पी.ई.किट खरेदी न करताच आरोग्य विभागाकडून भेटल्यानंतरच नगरपालिकेकडून अंत्यविधी केला जात असे. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी मृत कोरोना रुग्णांची विटंबना, उशिराने होतात अंत्यविधी या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगरपालिकेने तत्काळ मृतदेह पॅक करण्यासाठी व अंत्यविधी करणाऱ्यांना लागणारे पी.पी.ई.किट खरेदी केले. यामुळे परघर सत्यनारायण करणाऱ्या नगरपालिकेने किट खरेदी केल्याने आरोग्य विभागाचा ताण कमी झाला.