नगरपालिकेने बेघरांना घरे बांधण्यासाठी जागा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:35+5:302021-05-22T04:30:35+5:30
माजलगाव : येथील नगरपालिकेच्या आरक्षित सर्व्हे नं. ३७९, ३७२, ३७३ मधील जागेचा नगरपालिकेने ताबा घेऊन या ठिकाणी बेघर-भोगवटादार यांना ...
माजलगाव : येथील नगरपालिकेच्या आरक्षित सर्व्हे नं. ३७९, ३७२, ३७३ मधील जागेचा नगरपालिकेने ताबा घेऊन या ठिकाणी बेघर-भोगवटादार यांना घरे बांधण्यासाठी जागा द्यावी. या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्यावतीने दि.२ जून रोजी या जागेवर ताबा आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांनी मुख्याधिकारी यांना २० मे रोजी दिले आहे.
नगरपरिषदेच्या आरक्षित जागा असून ती जागा नगरपरिषदेने ताब्यात घेऊन भोगवटदार व बेघर नागरिकांना प्लॉट पडून वाटप करावे. त्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी आंबेजोगाई यांचे दि. २२ एप्रिल रोजीचे आपणास पत्र दिले आहे. मात्र, आपल्या कार्यालयाने आजपर्यंत याप्रकरणी कोणतेही कारवाई केली नाही. बेघर कुटुंबांना घरे न मिळण्याच्या हेतूने आपण जागा ताब्यात घेण्यास दुर्लक्षित करीत आहे. या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले व करत आहेत. ते अतिक्रमण काढून वरील जागा खुली करण्यात यावी. यातील काही शिल्लक जागा आठवडी बाजारास कायम स्वरूपाची द्यावी, अन्यथा लोकतांत्रिक जनता दल पक्षाच्या वतीने २ जून रोजी या जागेवर ताबा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.