खुनातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:57 PM2020-02-07T23:57:19+5:302020-02-07T23:57:41+5:30
गुरुवारी रात्री जिल्हाभरात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानूसार ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबवण्यात आले. यादरम्यान गेवराई हद्दीत खूनातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
बीड : गुरुवारी रात्री जिल्हाभरात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानूसार ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबवण्यात आले. यादरम्यान गेवराई हद्दीत खूनातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दरोडाप्रतिबंधक पथकाने रात्री उशिरा केली.
गेवराई तालुक्यात आॅल आऊट आॅपरेशन साठी दरोडाप्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव व त्यांचे सहकारी गस्त घालत होते. यावेळी तालुक्यातील नागझरी वस्तीवर खूनातील फरार आरोपी असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पहाटेच्या सुमारास त्याठिकाणी दरोडा प्रतिबंधक पथाने नागझरी येथे आरोपीचा शोध घेतला. आपल्या मागावर पोलीस आहेत हे कळताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. भंबळ््या पाझऱ्या काळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली पथकाला दिली. हा आरोपी दरोडा प्रतिबंधक पथकाच्या हाती लागल्यामुळे इतर गुन्हे देखील उघड होण्यास मदत होणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्ष विजय कबाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, सोपोनि सावळे, सपोउपनि डी.बी आवारे, पोह नागरगोजे, पोना मनोज वाघ, महेश भागवत, महेश चव्हाण, चालक राठोड यांनी केली.