बीडमध्ये आणखी एक खुनाची घटना उघडकीस; दोन दिवस डांबून मारहाण, ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:05 IST2025-03-16T12:05:29+5:302025-03-16T12:05:52+5:30

विकास आण्णा बनसोडे हा मागील तीन वर्षांपासून ट्रक चालक म्हणून कामाला होता. 

murder case revealed in Beed; Truck driver dies after being beaten for two days | बीडमध्ये आणखी एक खुनाची घटना उघडकीस; दोन दिवस डांबून मारहाण, ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू

बीडमध्ये आणखी एक खुनाची घटना उघडकीस; दोन दिवस डांबून मारहाण, ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू

नितीन कांबळे

कडा (बीड):  विकास आण्णा बनसोडे हा मागील तीन वर्षांपासून ट्रक चालक म्हणून कामाला होता. दोन दिवसापुर्वी  तो गावात आला असता कुटुंबातील काही लोकांनी त्याला डांबून ठेवत मारहाण केली.या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारहाण का व कोणत्या कारणावरुन केली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील एका कुटुंबाकडे मागील तीन वर्षांपासून जालना जिल्ह्य़ातील बोरगांव येथील २३ वर्षीय विकास बनसोडे हा ट्रक चालक म्हणून काम करत होता. पण काही महिन्यांपुर्वी त्याला कामावरून काढले होते. बनसोडे हा पिंपरी या गावात मित्रासह दोन दिवसापुर्वी आला होता. मित्र पळून गेला. मालकाने विकासला पकडून डांबून ठेवत बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. मारहाण करून खून का केला याचे कारण अद्याप समोर आले नाही.

कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी मृतदेह ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारने गांभीर्याने या प्रकरणाची दखल घ्यावी. क्रूरपणे दलित तरुणाचे हत्याकांड झालं आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे.अशी मागणी ऑल इंडिया पॅथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.

Web Title: murder case revealed in Beed; Truck driver dies after being beaten for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.