माजलगावात ढाबा चालकाचा खून; आळंदीत आतेभावाच्या घरी लपलेल्या तीन आरोपींना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:51 IST2025-04-23T12:50:28+5:302025-04-23T12:51:55+5:30
रोहित थावरे आणि त्याच्या इतर दोन मित्रांचा बिल देण्यावरून वाद झाला यातून ढाबा चालकाचा खून झाला

माजलगावात ढाबा चालकाचा खून; आळंदीत आतेभावाच्या घरी लपलेल्या तीन आरोपींना बेड्या
माजलगाव : येथील महादेव गायकवाड या ढाबा मालकाचा रविवारी रात्री किरकोळ कारणावरून खून झाला होता. या प्रकरणात तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रोहित शिवाजीराव थावरे, ऋषीकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे हे तिघेही आरोपी हे आळंदीत आतेभावाच्या घरात लपले होते. या सर्व आरोपींना माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.
परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. यावर रोहित थावरे आणि त्याच्या इतर दोन मित्रांचा बिल देण्यावरून वाद झाला. यात मारहाण झाल्याने महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर मुलगा अशुतोष आणि आचारी जखमी झाले होते. या प्रकरणी आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यावरून या तीनही आरोपींना पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे मंगळवारी पहाटे पकडण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.