कुऱ्हाडीने वार करून गर्भवती सुनेचा खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

By सोमनाथ खताळ | Published: May 9, 2023 07:21 PM2023-05-09T19:21:06+5:302023-05-09T19:21:21+5:30

सुनेला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या पत्नीवरही कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Murder of a pregnant daughter-in-law with an axe; Father-in-law sentenced to life imprisonment | कुऱ्हाडीने वार करून गर्भवती सुनेचा खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

कुऱ्हाडीने वार करून गर्भवती सुनेचा खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

अंबाजोगाई - मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून गर्भवती सुनेला ठार मारून स्वतःच्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला करणारा सासरा बालाजी लव्हारे (रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. घरत यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे २०२० साली सदरील घटना घडली होती. आरोपी बालाजी याच्या मुलाचा शीतल हिच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. याचा राग बालाजीच्या मनात होता. २७ ऑगस्ट रोजी शीतल तिच्या आईसोबत फोनवर बोलत असताना सासरा आरोपी बालाजी लव्हारे याने तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. यावेळी शीतल सहा महिन्याची गर्भवती होती. दरम्यान, बालाजीची पत्नी सुवर्णा या सुनेला सोडविण्यासाठी गेल्या असता बालाजीने त्यांच्याही पाठीत कुऱ्हाडीने दोन वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मयत शीतलचे वडील किसन कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहा. पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात आरोपीची पत्नी आणि मुलीची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. घरत यांनी बालाजी लव्हारे यास दोषी ठरवून जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एल. बी. फड यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी गोविंद कदम व सोडगीर यांनी सहकार्य केले.

Web Title: Murder of a pregnant daughter-in-law with an axe; Father-in-law sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.