सहा दिवसाला खून, ७२ तासाला बलात्कार, नऊ जणींना फूस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:02+5:302021-09-19T04:35:02+5:30
बीड: जिल्ह्यात महिला अत्याचारासह खून, अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढताच आहे. सहा दिवसाला एक खून, ७२ तासाला बलात्कार, तर ...
बीड: जिल्ह्यात महिला अत्याचारासह खून, अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढताच आहे.
सहा दिवसाला एक खून, ७२ तासाला बलात्कार, तर महिन्याकाठी ९ अल्पवयीन मुलींचे अपहरण केले जाते. एनसीआरबी (नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो) २०२०चा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यातून समोर आलेले वास्तव धक्कादायक आहे. जिल्हा पोलीस दलासमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान कायम आहे. प्रतिबंधात्मक उपायांसोबतच कडक कायदेशीर कारवायांसाठी पोलीस यंत्रणेला सजग रहावे लागणार आहे.
...
अहवालानंतरची आकडेवारी सांगतेय... २०२० २०२१
खून २०२०
५३
२०२१
३६
बलात्कार २०२०
१२९
२०२१
९८
फूस लावून पळविणे २०२०
१०७
२०२१
८५
....
तीन घटनांनी हादरला होता जिल्हा
घटना क्र.१
गोपाळपूर (ता.परळी ) येथे गरीब २५ वर्षीय विवाहितेवर गावातीलच नराधमाने अत्याचार केला. पीडितेचा पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून पाच महिन्यांपासून नराधम तिला त्रास द्यायचा. अखेर २४ फेब्रुवारी २०२० रोजी पीडितेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी पीडितेने हातावर लिहिलेल्या मजकुरावरून पोलिसांनी राम उर्फ माउली लक्ष्मण नवगरे याच्या मुसक्या आवळल्या.
....
घटना क्रमांक २
केज तालुक्यात एप्रिल २०२०च्या सुरुवातीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली होती. पीडितांनी आपल्या मैत्रिणीच्या मावशीला मेसेज पाठवून आपबिती सांगितल्यावर नराधम पित्याचा किळसवाणा चेहरा समोर आला होता. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली होती.
....
घटना क्रमांक ३
शेतीच्या वादातून मांगवडगाव (ता.केज) येथे १३ मे २०२० रोजी तिहेरी हत्याकांड घडले होते. जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर दुसऱ्या गटाने प्राणघातक हल्ला चढविला होता. पिता बाबू शंकर पवार (६५) यांच्यासह प्रकाश बाबू पवार (५०) व संजय बाबू पवार (४५) ही दोन मुले असे एकाच कुटुंबातील तिघे मृत्युमुखी पडले होते. या थरारक घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात जमिनीचे वाद किती टोकाचे असतात याचा प्रत्यय आला.
....