पतसंस्थेकडे गहाण ४० गुंठ्याची परस्पर विक्री; मंडळाधिकारी, तलाठ्यासह खातेदारांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 03:53 PM2023-03-11T15:53:09+5:302023-03-11T15:54:03+5:30

या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

Mutual sale of 40 units mortgaged to credit institutions; Crime against board officer, Talatha along with account holders | पतसंस्थेकडे गहाण ४० गुंठ्याची परस्पर विक्री; मंडळाधिकारी, तलाठ्यासह खातेदारांवर गुन्हा

पतसंस्थेकडे गहाण ४० गुंठ्याची परस्पर विक्री; मंडळाधिकारी, तलाठ्यासह खातेदारांवर गुन्हा

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा -
धानोरा येथील पतसंस्थेकडे दोन खातेदांरानी गहाणखत म्हणून ठेवलेल्या दोन हेक्टर क्षेत्रापैकी ४० गुठ्ठे क्षेत्राची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल आहे. या प्रकरणी व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात दोन तलाठी, एक मंडळाधिकारी यांच्यासह कुंबेफळ येथील दोन खातेदार अशा पाच जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील धानोरा येथील श्री. स्वामी समर्थ ग्रामीण पतसंस्थेत कुंबेफळ येथील दोन खातेदारांनी दोन हेक्टर आठ गुंठ्ठे क्षेत्र गहाणखत म्हणून ठेवले होते. नंतर संगणमत करून बॅकेचे परस्पर खाते निल केले. बाबतचे खोटे दस्तऐवज तयार केले. खोटे शिक्के तयार करून पतसंस्थेच्या नावे असलेले सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी केला. लालासाहेब रंगनाथ मुठे यांनी बॅकेला गहाणखते ठेवलेल्या क्षेत्रापैकी २ हेक्टर ८ गुंठ्ठे इतके क्षेत्र मुलाच्या नावे वाटणीपत्र केले. शहाजी गाडे यांनी पतसंस्थेला गहाणखत म्हणून दिलेल्या क्षेत्रापैकी ४० गुंठ्ठे हे क्षेत्र किंमत २८ लाख ४० हजार रूपयांची बॅकेची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार १० मार्च २०२३ पूर्वी घडला आहे.

या प्रकरणी बाजीराव सिताराम गव्हाणे रा.पिंपरखेड ता.आष्टी व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धानोरा याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अंभोरा पोलिस ठाण्यात आरोपी लालासाहेब रंगनाथ मुठे खातेदार ,तत्कालीन तलाठी बापु पांडुरंग गव्हाणे, मंडळधिकारी संभाजी नामदेव गवळी, संदिप शहजी गाडे खातेदार, तत्कालीन तलाठी गणेश काशिनाथ गावडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.

 

Web Title: Mutual sale of 40 units mortgaged to credit institutions; Crime against board officer, Talatha along with account holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.