एमव्हीएससी पदविकाधारक ठरू लागले बोगस डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:42+5:302021-07-16T04:23:42+5:30

संतापाची लाट : तहसीलदारांना दिले निवेदन माजलगाव : पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन ही शासनमान्य पदविका उत्तीर्ण असलेल्या पदविधारकांवर बोगस ...

MVSC diploma holders became bogus doctors | एमव्हीएससी पदविकाधारक ठरू लागले बोगस डॉक्टर

एमव्हीएससी पदविकाधारक ठरू लागले बोगस डॉक्टर

Next

संतापाची लाट : तहसीलदारांना दिले निवेदन

माजलगाव : पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन ही शासनमान्य पदविका उत्तीर्ण असलेल्या पदविधारकांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली जात असून, या धोरणामुळे पदवीधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील या पदवीधारकांनी हा प्रश्न तहसीलदारांकडे मांडला आहे.

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खात्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदावर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन शासनमान्य पदविका उत्तीर्ण असलेले पदवीधारक काम करतात. गाय, म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करणे, गर्भ तपासणी करणे, वंधत्वावर साधारण उपचार करणे, जनावरांचे लसीकरण करणे, जखमा धुणे, मलमपट्टी आदी कामे

पशुधन पर्यवेक्षकांमार्फत केली जातात. राज्यात हजारोंच्या संख्येने पशुधन पर्यवेक्षक बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे हे पदविकाधारक त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करतात.

या बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेच्या सूचनेवरून बोगस पशुवैद्यक डॉक्टर म्हणून कारवाई केली जात आहे. त्यामुळे ही बाब अन्यायकारक असून, न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

माजलगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर पशू सेवादाता संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.आर. नाकलगावकर, उपाध्यक्ष गजानन चव्हाण, दत्ता गातवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

140721\1857purusttam karva_img-20210714-wa0024_14.jpg

Web Title: MVSC diploma holders became bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.