अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडीत भूगर्भातून गूढ आवाज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:08+5:302021-09-09T04:40:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई (जि.बीड) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येऊ लागल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीत ...

Mysterious sound from underground in Kendrawadi in Ambajogai taluka - A | अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडीत भूगर्भातून गूढ आवाज - A

अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडीत भूगर्भातून गूढ आवाज - A

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई (जि.बीड) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येऊ लागल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गूढ आवाजाच्या भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. घटनेची माहिती समजताच उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचवून काळजी घेण्याचे आवाहन केेले. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. या आवाजाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कायमच असा आवाज सातत्याने येऊ लागल्याने या घटनेची माहिती केंद्रेवाडीच्या सरपंच योगिता केंद्रे यांनी प्रशासनास दिली. मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील व महसूलच्या पथकाने केंद्रेवाडी येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली. असे आवाज पंचक्रोशीत दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ... सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी कच्या घरात न थांबता पक्या घरात थांबावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या गूढ आवाजासंदर्भात भूगर्भ शास्त्रज्ञांनाही माहिती दिली आहे. ते या भागाची पाहणी करण्यासाठी येत आहेत, असे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी सांगितले, तर ज्या ग्रामस्थांकडे पक्के घरे नाहीत अशा ग्रामस्थांना शाळेत राहण्याची सुविधा गावच्या सरपंच योगिता केंद्रे यांनी उपलब्ध करून दिली आहे. ... ३३ वर्षांपूर्वीही आले होते गूढ आवाज केंद्रेवाडी व परिसरातील गावांमध्ये अशा प्रकारचे गूढ आवाज ३३ वर्षांपूर्वीही आले होते. त्या काळात अनेक जुनी घरे पडली होती. त्यानंतर १९९१ साली किल्लारी व परिसरात भूकंप झाला होता. असे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, सोमवारपासून पुन्हा असे आवाज येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ... भूजलच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी : मुंदडा केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येत आहे. मध्यरात्री मोठा आवाज झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गूढ आवाजाबाबत भूजल सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांना त्वरित पाहणी करण्यासाठी केंद्रेवाडीत पाठवावे. उच्चस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ....

Web Title: Mysterious sound from underground in Kendrawadi in Ambajogai taluka - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.