गुढ आवाजाने आवरगाव हादरले ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 11:41 PM2021-09-29T23:41:21+5:302021-09-29T23:42:09+5:30

गुढ आवाजाचा गावकर्‍यांनी धसका घेऊन सर्व गाव रस्त्यावर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबले आहे.

A mysterious voice shook Awargaon, creating an atmosphere of fear among the villagers | गुढ आवाजाने आवरगाव हादरले ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गुढ आवाजाने आवरगाव हादरले ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Next

धारूर : धारुर शहरापासून चार किमी अंतरावर असणार्‍या आवरगाव येथे अचानक रात्री दहा वाजता जमिनीतून गुढ आवाज झाल्याने पूर्ण गाव हादरले आहे. पत्राची घरे आणि जूने मातीकाम असणार्‍या घरांच्या भिंतीला मोठ्याप्रमाणावर हादरे बसले आहेत. पूर्ण गावकरी एकत्र गावाच्या बाहेर रस्त्यावर जमा झाले असून प्रशासनास या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

धारुर तालुक्यातील आवरगाव येथे अचानक 10 वाजता जमिनीतून गुढ स्वरूपाचा मोठ्या प्रमाणावर आवाज झाल्याने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. मागील चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाल असताना अचानक झालेल्या गुढ आवाजाचा गावकर्‍यांनी धसका घेऊन सर्व गाव रस्त्यावर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबले आहे. सदरील घटनेची माहिती प्रशासनास देण्यात आलेली आहे. झालेला गुढ आवाज नेमका कशाचा आहे याचा अद्यापपर्यंत अंदाज लागू शकला नसल्याने भूकंप होतो की काय? या भीतीने गावकरी रस्त्यावर आले आहेत. दरम्यान, प्रशासनाने याबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दहा वाजता मोठ्या प्रमाणावर जमिनीतून आवाज येऊन पूर्ण गाव हादरून गेले. सदरील आवाजाने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना घराच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

-अमोल जगतापस, रपंच, आवरगाव

Web Title: A mysterious voice shook Awargaon, creating an atmosphere of fear among the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड