आठ मोरांच्या मृत्यूचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:40+5:302021-02-05T08:20:40+5:30
शिरूर कासार : तालुक्यातील लोणी शिवारात मागील आठवड्यात एकापाठोपाठ एक अशा दोन दिवसांत १३ मोरांचा मृत्यू झाला होता. ...
शिरूर कासार : तालुक्यातील लोणी शिवारात मागील आठवड्यात एकापाठोपाठ एक अशा दोन दिवसांत १३ मोरांचा मृत्यू झाला होता. पैकी पहिल्या पाच मोरांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल आला होता. तर दुसऱ्या दिवशी मृत्यू झालेल्या आठ मोरांचा अहवाल बर्ड फ्लू निगेटिव्ह आला होता. या मोरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुन्हा तपासणी केली असता विषबाधादेखील नसल्याचा अहवाल आल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सांगितले. सध्या तरी मोरांचा मृत्यू अकस्मात असल्याचे सांगण्यात येत आहे. लोणी शिवारात पहिल्या दिवशी पाच मोरांची मरतुक झाली. ते बर्ड फ्लूचे बळी ठरले हे स्पष्ट झाले. मात्र लागलीच दुसऱ्या दिवशी पुन्हा आठ मोरांचा मृत्यू झाला. दोनच दिवसात १३ मोरांच्या मृत्यूमुळे पशुसंवर्धन, वनविभाग आणि पक्षीमित्रांमध्ये घबराट पसरली होती.