नागझरी खून प्रकरण; सात जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:31 AM2019-04-06T00:31:48+5:302019-04-06T00:32:20+5:30
गेवराई तालुक्यातील नागझरी येथे एकावर तलवारीने हल्ला करून खून केला होता. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गेवराई ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : गेवराई तालुक्यातील नागझरी येथे एकावर तलवारीने हल्ला करून खून केला होता. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गेवराई ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मागील गुन्ह्यात झालेल्या खर्चावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तिघांना अटक केली आहे.
उत्तरेश्वर भारत पवार (३४ रा.नागझरी) असे मयताचे नाव असून नारायण भारत पवार असे जखमीचे नाव आहे. तर गाड्या झरक्या चव्हाण, वाघ्या झरक्या चव्हाण, काक्या झरक्या चव्हाण, भंबळ्या पांगऱ्या काळे, सचिन भांबळ्या काळे, पहरेकर उंबऱ्या भोसले, झरक्या गणपती चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. उत्तरेश्वर व वाघ्या, गाड्या व इतरांमध्ये पैशावरून वाद सुरू होता. २०१६ साली या लोकांनी माजलगावमध्ये दरोडा टाकून एका व्यक्तीचा खून केला होता. यामध्ये हे लोक काही दिवस कारागृहात होते. तसेच या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी व इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता. याच खर्चावरून त्यांच्यात वाद होत होते. यातूनच गुरूवारी सायंकाळी गाड्या, वाघ्या व इतर पाच जण नागझरीत आले. कुºहाड, तलवारीने हल्ला चढवून त्यांनी उत्तरेश्वरची हत्या केली. तर नारायणवरही तलवारीने सपासप वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आगोदर जिल्हा रूग्णालयात उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबदला हलविले आहे. जावेद उर्फ पप्पू विश्वास चव्हाण (रा.नागझरी ता.गेवराई) यांनी याबाबत गेवराई ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास सपोनि राजाराम तडवी हे करीत आहेत.
दरम्यान, यातील मुख्य आरोपी गाड्या, वाघ्या आणि काक्या या तिनही भावांना दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि गजानन जाधव व त्यांची टिम, स्थागुशाचे सपोनि अमोल धस व गेवराई पोलिसांनी अटक केली. जाधव, धस यांनी या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी उसाच्या शेतात सापळा लावला होता.